अखेर त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल ; दिव्यांग तरूणीवर अतिप्रसंगाचा केला होता प्रयत्न

कोकणसाद Live चा इम्पॅॅक्ट्
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 03, 2023 21:09 PM
views 98  views

वैभववाडी : तालुक्यातील एका गावातील दिव्यांग तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात पिडीत तरूणींच्या आईने पोलीसांत तक्रार दिली आहे. या विषयाला कोकणसाद Live ने वाचा फोडली होती.  दरम्यान हे प्रकरण मिटविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.


तालुक्यातील एका गावातील दिव्यांग तरूणी २९ मे २०२३ रोजी घरात एकटीच होती. तेथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने घरात कुणी नसल्याचे पाहुन तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तिने आपल्या आईला हा प्रकार सांगीतला.मात्र गावातील काहीनी हे प्रकरण गावातच मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता पिडित तरुणीच्या नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र याबाबत कोकणसाद लाईव्हने प्रथम बातमी प्रकाशित करून या प्रकरणाला वाचा फोडली. अखेर त्यानंतर  आज सायकांळी पिडीत तरूणी आणि तिचे आई वडील वैभववाडी पोलीसांत आले.त्यांनी त्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे. पोलीसांनी त्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील हे करीत आहेत.