खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन ; साबाजी सावंत आक्रमक

Edited by: संदीप देसाई
Published on: July 14, 2023 19:16 PM
views 72  views

दोडामार्ग :  कोलझर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे १९ जुलै पर्यंत बुजवावेतअन्यथा २१ जुलै रोजी ग्रामस्थांसहित भर पावसात रस्त्यावर झोपून रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांसहीत विलास देसाई, निलेश चव्हाण, दत्ताराम पास्ते, किरण काजरेकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद बांधकामचे उप अभियंता यांना निवेदन दिल आहे.

       दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, पादचारी, शालेय विद्यार्थी व दिव्यांग यांना या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे खड्डे १९ जुलै पर्यंत बुजविण्यात यावेत. अन्यथा कोलझर गावातील ग्रामस्थांसहीत २१ जुलै रोजी भर पावसात रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी गावातील दिव्यांग, वयोवृद्धांना काही इजा झाल्यास तसेच वाहतूक विस्कळीत झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा बांधकाम विभागाची राहील असा इशाराही या  निवेदनाद्वारे साबाजी सावंत यांनी दिला आहे.