
कणकवली : कणकवली बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खट्टे पडले आहेत. खड्ड्यांतून बसचालकांना कसरत करावी लागते. बसमधील प्रवाशांना देखील याचा त्रास होत आहे. तसेच बस जाताना पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहे. तसेच बसस्थानकातील संरक्षण भित देखील कोसळली आहे. बसस्थानकात स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्यामुळे सर्व समस्या सोडविण्यासाठी पुढील १० दिवसात योग्य ती कार्यवाही करावी तसे न झाल्यास युवासेना कणकवली बसस्थानकात धडक देईल असे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, एसटी सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.