
कणकवली : कणकवली शहरापासून जवळ असलेल्या कलमठ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पुरस्कृत श्री देव काशीकलेश्वर विकास पॅनलचे रामदास विखाळे व भाजप पुरस्कृत सरपंचपदासाठी संदीप मेस्त्री हे निवडणूक रिंगणात असून दुरंगी लढत होणार आहे.
कणकवली तालुक्यातील सर्वात मोठी दोन नंबर ग्रामपंचायत म्हणून कलमठ ग्रामपंचायत ओळखली जाते, या गावात 15 पेक्षा जास्त वाड्या असून 17 ग्रामपंचायत सदस्य संख्या आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपलं चिन्ह आणि आपण केलेली विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे