यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची 'महाचॅॅनेल'ला फिल्ड व्हिजिट

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 07, 2022 17:13 PM
views 315  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE च्या प्रधान कार्यालयाला  भेट दिली. कोकणात डिजिटल मिडीयाचं पर्व आणणाऱ्या महाचॅॅनेलच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. 


कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE ला शैक्षणिक क्षेत्रातही विश्वासार्हतेचा नवा मानदंड मिळालाय. कोकणातल्या वाडीवस्तीवरच्या बातम्या काही क्षणात जगभरात पोहोचवणारं हे चॅनेल अनेक क्षेत्रातलं ट्रेडसेटर बनलंय. याचसाठी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल मिडियाचा धडा घेण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE भेट  दिली. सर्वात प्रथम कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत फिल्ड व्हिजिटची संधी दिल्याबद्दल यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्यावतीने आभार मानण्यात आले. भविष्यात विद्यार्थ्यांना पत्रकारितेत असलेल्या संधीची माहिती संपादक सागर चव्हाण यांनी दिली. तसेच नुकतच लाँच करण्यात आलेल्या प्रुडंंट प्लस अॅॅपचीही माहिती दिली. कोकणातल्या पहिल्या सुसज्ज स्टुडीओ पाहून विद्यार्थी भारावून गेले. कोकणसाद LIVE टीमने या विद्यार्थ्यांना 24 X 7 काम कसं चालत याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शंकांच कोकणसाद LIVEच्या टीमने निरसन केल.


यावेळी ब्युरो चीफ संदीप देसाई, IT हेड विद्धेश धुरी, यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचे कॉम्प्युटर विभागाचे अधिव्याख्याता श्रीधर मयेकर, तेजा गवंडी यांसह कंप्यूटर विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.