
दोडामार्ग : मांगेली गावचे ग्रामदैवत श्री सातेरी केळबाय रवळनाथ बारापंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव शनिवारी १४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यनिमित्ताने सर्व देवतांना शुध्दोदक स्नान, पहाटे ५.०० वाजता काकड आरती, देवतांना अभिषेक, आरती व तिर्थ-प्रसाद तसेच संध्याकाळी ५.०० वाजता दत्तजन्म, आरती व तिर्थ-प्रसाद, रात्री ठिक १२.०० वाजता देवीची महाआरती आणि त्यानंतर १.०० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचे महान पौराणिक नाट्यपुष्प गुलबर्गा येथील देवीचे माहात्म्य सांगणारे रहस्यमय, विनोदी व धडाकेबाज नाट्यपुष्प 'देवी चंद्रलांबा परमेश्वरी' हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तर रविवार दिनांक १५ डिसेंबरला सकाळी ठिक ७.०० वाजता गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे. अशाप्रकारे विविध धार्मिक कार्यक्रमांनी देवीचा जत्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी जत्रौत्सवास उपस्थित राहुन तिर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सातेरी केळबाय रवळनाथ बारापंचायत देवस्थान, मांगेली देऊळवाडी येथील देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ मंडळी यांनी केलं आहे.