उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना खतंं वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: July 27, 2023 18:48 PM
views 84  views

दोडामार्ग : माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने गुरवारी शेकडो शेतकऱ्यांना थेट गावात जावून खत वाटप कार्यक्रम करण्यात आला. 


   २७ जुलै हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी येता आठवडाभर संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून शिवसेना साजरा करणार आहे त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासून या भगवा सप्ताहाची सुरुवात झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली जि.प. मतदारसंघातील शेतकऱ्यांना शैलेश परब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने खत वाटप गावोगावी पोहचून करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, हिमांशू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा खत वाटप कार्यक्रम करण्यात आला.


जि. प. मतदार संघात कळणे, सासोली, मणेरी, कुडासे कुंब्रल, कोलझर या ठिकाणी शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत त्यांनी संघटनात्मक संवादही साधला व मार्गदर्शन केले. महिला उपजिल्हा संघटिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संपदा देसाई, सौ विनिता घाडी, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, लक्ष्मण आयनोडकर, मोर्लैकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.