
सावंतवाडी : वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू-वर परिचय मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील वैश्य भवन हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी वैश्य समाज बांधव तथा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, वैश्य समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या वस्तीगृहाच्या पाच खोल्या माझ्या कुटुंबांतर्फे बांधून देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली. वैश्यवाणी समाज मेळाव्यात ते बोलत होते. समाज सक्षम झाला पाहिजे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे. समाजातील बांधवानी सुध्दा एकत्र येणे गरजेचे आहे आणि एकत्र आल्यास कोणतीही शक्ती आपल्याला मागे खेचू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. आम्ही समाजाच्या पाठिंब्यामुळे इथवर पोहचू शकलो. इतर समाजाची साथ देखील आम्हाला आहे. परंतु आपल्या समाजाची असणारी साथ ही अधिक प्रेरणा देते. वैश्यवाणी समाज हा इतर समाजाच्या मदतीसाठी पुढे सरसावणारा आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपला अधिक भर असेल असं मत व्यक्त केले. तर जिल्ह्यातील वैश्य समाजाच्या महिलांना आपण लवकरच महाराष्ट्र भ्रमंतीच्या ट्रिप साठी पाठविणार असल्याच जाहीर केले.
यावेळी माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराम धुरी, उपाध्यक्ष अॅड. पुष्पलता कोरगावकर, सेक्रेटरी शशिकांत नेवगी, खजिनदार गणेश बोर्डेकर, सदस्य दत्तप्रसाद मसुरकर, राजन पोकळे, साक्षी वंजारी, किर्ती बोंद्रे, नितीन वाळके, अशोक नाईक आदी उपस्थित होते.