
सावंतावडी : नेमळे तसेच आसपासच्या परिसरात गुरांना लंम्पि आजाराची लागण नेमळे त गोकुळ दूध संकलन केंद्र झाल्यापासून नेमळे तील पन्नास टक्के हुन अधिक शेतकऱ्यांनी दुभत्या गाई म्हशी खरेदी केल्या मात्र आठ ते दहा दिवसात लंपी या आजाराची लागण गुरांना झपाट्याने होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या आजारामध्ये गुरांना ताप येत असून गुरांच्या अंगावर फोड येतात नाकातून शेम्भूड येत असून एका पायाला सूज येते वेळीच उपचार न केल्यास गुरे दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अशी लक्षणें दिसताच वेळीच पासुवैद्यकीय अधीकाऱ्यांकडून उपचार करून घयावेत तसेच लंम्पिची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येत असून शेतकऱ्यानी सहकार्य करावे असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकारी धनंजय कुट्टार यांनी सर्व पशु पालक शेतकऱ्यांना केले आहे.