कणकवलीच्या फुटबॉल स्पर्धेत उतरणार एफ सी संघ

Edited by: विनायक गांवस
Published on: June 21, 2025 15:57 PM
views 94  views

सावंतवाडी : कणकवली येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एफ सी सावंतवाडी संघ सहभाग घेत असून सावंतवाडीचे प्रतिनिधित्व करणार आहे. भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या मान्सून चषक दरम्यान एफ सी सावंतवाडी हा संघ सुरू करण्यात आलेला होता.

त्यानिमित्त मोफत फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यातून एफ सी सावंतवाडी संघाची निवड चाचणी घेण्यात आलेली होती. श्री गावडे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एफ सी सावंतवाडी संघ कणकवली येथे खेळण्यास जात आहे. भविष्यात अशा अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तराव एफ सी सावंतवाडी संघ खेळताना दिसेल असे श्री. गावडे यांनी यावेळी सांगितले.