वडील मुलगा मासेमारीसाठी पाण्यात गेले...| पुढे भंयकर घडलं

Edited by:
Published on: June 09, 2024 05:21 AM
views 187  views

मालवण : तळाशील खाडी किनारी पात (छोटी होडी) बुडाली असून होडीतील एक जण पोहत तळाशील किनाऱ्यावर पोहोचला. मात्र अन्य दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. शनिवार 8 जून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या वाऱ्या पावसात होडी नदीपात्रात (खाडी) उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान बेपत्ता दोघा मच्छिमारांचा शोध सूरू आहे. मालवण पोलिसांनी दिलेल्या महिनानुसार किशोर महादेव चोडणेकर (वय 55), मुलगा लावण्य किशोर चोडणेकर  (वय 14), दोन्ही रा. तळाशील मालवण तसेच धोंडीराज परब (वय 55) मूळ रा. तारकर्ली हे तिघे 8 जून रोजी सायंकाळी उशिरा तळाशील खाडीमध्ये पात (छोटी होडी) घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. सर्जेकोट तळाशील समोर होडी असताना असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे होडी नदीत (खाडीत) उलटल्याने तिघेही जण पाण्यामध्ये पडले.

होडीतून पाण्यात पडलेल्या तिघांपैकी लावण्य किशोर चोडणेकर या मुलाने पोहत पोहत तळाशील किनारा गाठला. आपल्या सोबत असलेले वडील किशोर चोडणेकर व धोंडीराज परब हे दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाल्याचे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सांगितले. पाण्यात बुडालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सूरू असून रात्रीचा अंधार तसेच पाऊस असल्याकारणाने शोध कार्यात अडथळे येत होते. स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागतून सकाळ पासूनही शोध मोहीम सूरू आहे. याबाबत माहिती मालवण पोलीस निरीक्षक  प्रवीण कोल्हे यांनी दिली.