हुंबरठ मध्ये भीषण अपघात | १ ठार

अपघातात कारचा चक्काचूर | तिघे गंभीर जखमी
Edited by:
Published on: December 28, 2023 11:57 AM
views 1825  views

कणकवली : तालुक्यातील हुंबरठ येथे महामार्गावर हुंबरठ तिठा येथे पुलावर कारचा अपघात होत एक जण ठार झाला आहे. अपघाता नंतर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.