परप्रांतीयांचं आक्रमण ; आंबोली ग्रामस्थांचं उपोषण !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2024 10:35 AM
views 329  views

सावंतवाडी : आंबोली गावात बाहेरच्या लोकांनी केलेलं इमारती हॉटेल्स,बंगले यांचे अतिक्रमण हटवून जागा स्थानिकांना द्यावी व दिलेले घरनंबर रद्द करावे, महसूल विभागाने या  इमारती तात्काळ पाडून टाकाव्यात यासाठी आंबोली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंबोली हिरण्यकेशी येथे अतिक्रमण ठिकाणी पेरीचे भाटले येथे फौजदार वाडी गावठणवाडी, रमाईनगर येथील सुमारे १५० च्यावर ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसले आहेत. 


याप्रसंगी झिला गावडे, बाळकृष्ण गावडे,संतोष गावडे, प्रकाश गुरव, शंकर गावडे,प्रवीण राऊत, पांडुरंग गावडे, धोंडी गावडे, दत्ताराम पेंडसे,उमेश गावडे, विठ्ठल गावडे, प्रवीण गावडे, उत्तम गावडे, शैलेश गावडे, प्रथमेश गावडे, गुणाजी गावडे, धोंडी गावडे,अरुण राऊत, हेमंत मेस्त्री,परशुराम पेंडसे, दिलीप राऊत, संजय राऊत, गोविंद जाधव, भाई जाधव, प्रकाश जाधव, अनंत जाधव, कृष्णा जाधव,राकेश अमृस्कर, अमित गुरव, रोहित मेस्त्री,अंकुश राऊत, रामा गुरव, सुधीर राऊत,दशरथ गुरव,प्रदीप गावडे, लिंगराज राऊत,काशीबाई गावडे, लक्ष्मी राऊत, जयवंती मोहिते, मनाली गावडे, लक्ष्मी कुडतरकर, शुभांगी नाईक, दीपिका गुरव, सुहासिनी गावडे, नीलम गावडे, रंजना जाधव, मालिनी सावंत, लक्ष्मी धुरी, सुमित्रा जाधव, रंजना गावडे,अनिता जाधव, सुगंधा जाधव, भगवान राऊत, नवसु गावडे, जयश्री जाधव, सीताराम नाईक, पार्वती जाधव आदी ग्रामस्थ साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.