८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचं उपोषण | अर्चना घारे-परब यांची यशस्वी मध्यस्थी

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 14:15 PM
views 335  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल रेवकोंडवाडी येथे सदानंद सिताराम सांगळे या ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीने प्रशासनाच्या विरोधात उपोषण छेडले होते. याबाबत तहसील प्रशासनासोबत चर्चा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी यशस्वी मध्यस्थी करत उपोषण सोडविलं.

त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेला डोंगर अतिरेकी पद्धतीने खोदाई केल्यामुळे राहत्या घरास, कुटुंबास व शेतीस धोका निर्माण झाला‌. याबाबत त्यांनी डोंगर मालक व स्थानिक प्रशासन यांच्या निदर्शनास आणून सुद्धा डोळेझाक केल्याची त्यांची तक्रार होती. या व्यक्तीस लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुर्यकांत राऊळ, राजकुमार राऊळ, गौरी गावडे पदाधिकारी, माडखोल ग्रामस्थ आदी उपस्थित होते.