मृत धनंजय फालेच्या कुटुंबांला आर्थिक मदतीसाठी आमरण उपोषण...!

Edited by:
Published on: September 04, 2023 16:37 PM
views 1461  views

कुडाळ : महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले अपघात मृत्यूप्रकरणी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, मयत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी  कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे केरवडे ग्रामस्थ, पिंगळी शेटकर वाडी गुढीपूर ग्रामस्थ, कुडाळ तालुका धनगर समाज या सर्वांच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, एजंटांवर कारवाई झालीच पाहिजे, पर्यावरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या उपोषणकर्त्यांच्या घोषणांनी अधीक्षक अभियंता कार्यालय दानानून सोडल आहे.

21 जुलै रोजी अकरा केवी लाईन वर काम करताना धनंजय फाले यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर या फाले कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत मिळावी यासाठी अधीक्षक अभियंतांना निवेदन देण्यात आले होते. मात्र आज पर्यंत मागणी पूर्ण न झाल्याने आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. या उपोषणास कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष  गोविंद सावंत, काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाठ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजे नाईक, माझी जि प सदस्य राजू कविटकर, कानू शेळके, सुरेश वरक, गंगाधर कुबल, गंगाराम कोकरे, नितेश कोकरे, आदी उपस्थित आहेत.