
सावंतवाडी : आंबेगाव सटवाडी, येथील तांडावस्ती मधील धनगर समाजासाठी मंजुर झालेला रस्ता ग्रामपंचायत आणि पोलिस पाटिल यांचे कुटुंबयांच्या संघनमताने अडविण्यात आला असून रस्ता शासनाच्या २३ नं ला नोंद आहे. या संदर्भात ग्रामपंचायत, पंचायतसमिती, पोलिस स्टेशन यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे. तरी या रस्त्या संदर्भात कोणीही दखल न घेतल्यामुळे रमेश नवलू पाटील यांनी पंचायत समिती समोर उपोषण छेडले होत.
हा रस्ता आमच्यासाठी गरजेचा तसेच आरोग्याच्या बाबतीत महत्त्वाचा असल्याने आमचा हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत मंजूर करुन द्यावा अशी मागणी केली आहे. पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत आणि पोलिस पाटिल यांच्या कुटुंबयांच्या संघनमताने रस्ता अडविण्यात आल्यान उपोषण छेडले. यावेळी रमेश नवलू पाटील व कुटुंबिय उपोषणास बसले होते.