लोडशेडींग दोषींवर कारवाईसाठी उपोषण !

Edited by: प्रतिनिधी
Published on: January 24, 2023 17:07 PM
views 142  views

सावंतवाडी : मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बेजबाबदार महावितरण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचा इशारा विनायक लक्ष्मण गांवस यांनी दिला आहे. राज्यात कुठेही लोडशेडींग नसताना केवळ सावंतवाडी शहरात कोणत्याही प्रकारची कल्पना न देता दि. २० एप्रिल २०२२ रोजी मध्यरात्री अघोषित लोडशेडींग करण्यात आले. यावेळी जनआक्रोष निर्माण झाला. त्यामुळे बेजबाबदारपणे वागून मध्यरात्री लोडशेडींग करत जनतेला वेठीस धरणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर निलंबनात्मक कारवाई करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने उर्जा विभागास तर पालकमंत्री चव्हाण यांनी

विद्युत महावितरण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. परंतु आजमिती पर्यंत याबाबत अधीक्षक अभियंतांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या घटनेतील दोषींवर तात्काळ निलंबनात्मक कारवाई न झाल्यास येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा 

विनायक लक्ष्मण गांवस यांनी दिला आहे.