
दोडामार्ग : राज्य प्राण्याचा दर्जा असलेला शेकरू हा प्राणी दोडामार्ग मधील झोळंबे, कोलझर परिसरात नारळ बागायतीत मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यामुळे या शेकरू प्राण्याचा बंदोबस्त करा अशी मागणी इथल्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
दोडामार्ग कोलझर व झोळंबे पांचक्रोशीत वन्य हत्तीनी शेती बागायतीत हैदस घालून झाल्यानंतर आता या शेकरू व लाल तोंडी माकडाकडून नारळ बागायतीचे अतोनात नुकसान केले जातं आहे. इथला शेतकरी वर्ग हा नारळ, सुपारी या शेती बागयातीवर आपली वर्षाची पुंजी उभी करत असतो नारळ, सुपारी, हे मुख्य पीक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मेहनत करत असतो, अशातच या जंगली प्राणी शेकरू व माकडांपासून या बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांनी जगायचं कस शासनाकडून याची नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. मिळाली तर तुटपुंजी, यामुळे बागायतीसाठी केलेला खर्च ही उभा होत नाही. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.










