शेतकरी संघटना उमेदवार उभा करणार..?

Edited by:
Published on: October 21, 2024 13:27 PM
views 347  views

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी चर्चा, विनिमय बैठक वेंगुर्ला येथे श्री. जयप्रकाश चमणकर तसेच सावंतवाडी येथे जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर  यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात शेतकरी उमेदवार उभा करण्याविषयी एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनानी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

सदर बैठकीस सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. दिवाकर म्हावंळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोनापाल माजी सरपंच श्री. सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष श्री. संजय देसाई, प्रगत शेतकरी श्री. निलेश नाडकर्णी, जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक श्री. वसंत (अण्णा) केसरकर, सामाजिक कार्यकर्ते आणि वेंगुर्ला नगर परिषद माजी सभापती श्री. जयप्रकाश चमणकर, राजा शिवाजी शेतकरी संघटना वेंगुर्ला अध्यक्ष श्यामसुंदर राय, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष श्री. राजेंद्र अंदुर्लकर, सचिव श्री.हनुमंत गवंडी , सदस्य श्री. भानुदास गवंडी, श्री. शेखर नाईक, श्री. ,गजेश नाईक, श्री. शरद आरोसकर, शिरोडा वेळागर सर्व्हे क्र. ३९ संघर्ष समिती  पदाधिकारी श्री. आजू आंबरे, श्री. आग्नेल सोज, श्री. नेल्सन सोज आदी उपस्थित होते.