नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शेतकरी दिवस

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2024 18:30 PM
views 185  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये शेतकरी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना जगाच्या पोशिंदयाची ओळख व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकले विद्यार्थी शेतकऱ्यांच्या  वेशभूषेत शाळेत आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पेरणी कशी करावी याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन केजी विभागच्या शिक्षिका श्वेता आलते, भक्ती पाटील आणि तृप्ती साटविलकर यांनी केले होते.