देवगडमध्ये जड अंतकरणानं बाप्पांना निरोप..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 30, 2023 11:25 AM
views 171  views

देवगड : देवगड येथे पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात जड अंतकरणाने गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणपती सह घरगुती गणपतींचे गुरुवारी सायंकाळी भक्तीमय  वातावरणात विसर्जन करण्यात आले.

तालुक्यात गौरी गणपती विसर्जनानंतर असलेल्या इतर गणपतीचे गुरुवारी सायंकाळी विसर्जन झाले. ढोल - ताशा, डिजे यांच्या तालावर बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. गावांमधील सुमारे २०० हून अधिक घरगुती गणपतींचे सायंकाळी ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील देवगड तालुक्यातील गणपतींचे रात्री उशिरा समुद्रावर व नदीवर गणपती विसर्जन करण्यात आले. गणपतींच्या भव्य विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. गणेश नामाचा जयघोष करीत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.