
दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १४ व्या वर्षातील पुरस्कार बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण ११ जुलै रोजी वेंगुर्ला येथे होणार असल्याची माहिती फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी २ मे रोजी होणाऱ्या आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या १४ व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत माहिती दिली.
धाऊसकर फार्म येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऍड. सोनू गवस, रामा ठाकूर, दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस, दै. तरुण भारत संवादचे पत्रकार तेजस देसाई, माजी सरपंच प्रवीण परब उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हे पुरस्कार गेल्या तेरा वर्षांपासून देण्यात देणार आहे. तर यंदाच्या १४ व्या वर्षी घोषित करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे - आदर्श शिक्षक फरा पुरस्कार अरुण पवार ( केंद्रशाळा – कोलझर, ता. दोडामार्ग ), अध्यापन भास्कर फरा पुरस्कार वैभव खानोलकर ( उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, ता. वेंगुर्ला ), आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार दिनेश केळुसकर ( संपादक, दै. हेरॉल्ड, गोवा ), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी फरा पुरस्कार राधाकृष्ण उर्फ बाबली आकेरकर ( मु. आकेरी, ता. कुडाळ), सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार गायत्री गंगाराम निगुडकर ( ओंकार प्रिंटिंग प्रेस, मळगाव, ता. सावंतवाडी ), आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉ. जि. एन. लाड ( कलंबिस्त, ता. सावंतवाडी ), स्मार्टग्राम फरा पुरस्कार ग्रामपंचायत कोचरा ता. वेंगुर्ला, ( योगेश तेली), आदर्श कृषिरत्न फरा पुरस्कार संजय विठ्ठल गावडे ( आंबेगाव, ता. सावंतवाडी ) आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार संदेश बाबासाहेब देसाई ( पत्रकार , पाल पुनर्वसन, ता. दोडामार्ग),संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत / भजनी सेवा फरा पुरस्कार सुधीर सावंत बुवा ( सावंतवाडा, ता. दोडामार्ग ), शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार साक्षी नारायण परब ( धवडकी, माडखोल, ता. सावंतवाडी ), आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार मुकुंद परब, ( ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असनीये, ता. सावंतवाडी), आदर्श अध्यात्म फरा पुरस्कार प्रशांत धोंड बुवा ( माजी मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल, पिंगुळी, ता. कुडाळ ), आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार कृष्णा उर्फ दादा सावंत ( माजी उपसभापती, ता. सावंतवाडी ), आदर्श भारतमाता सेवा पुरस्कार कर्नल विजयकुमार सावंत, ( निगुडे ता. सावंतवाडी), आदर्श जीवनगौरव फरा भूषण पुरस्कार डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर ( निवृत्त वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी ) आदीं सर्व व्यक्तींना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्काराचे असे आहे स्वरूप
जाहीर केलेल्या पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गौरवग्रंथ, मेडल, सन्मान लोगो असे असणार आहे. तसेच प्रेमानंद देसाई, ॲड. पी. डी. देसाई, ॲड. सोनू गवस, रामा ठाकूर, तेजस देसाई, संतोष देसाई, रत्नदीप गवस, संदीप पाटील, डॉ. विद्यानंद देसाई, प्रवीण परब, अमित दळवी आदींनी या पुरस्कारांसाठी वरील सर्व व्यक्तींची निवड केली आहे अशीही माहिती यावेळी देसाई यांनी दिली. तसेच या दिवशी गुरुपौर्णिमा कार्यक्रम देखील साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी दशावतार नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरूंची पाद्यपूजा करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रेमानंद देसाई व ॲड. सोनू गवस यांनी स्पष्ट केले आहे.