प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सिंधुदुर्गात...!

जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांशी मराठीतून साधणार संवाद | उपस्थित राहण्याचे अच्युत सावंत-भोसलेंच आवाहन
Edited by:
Published on: December 11, 2023 19:06 PM
views 237  views

सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर २० डिसेंबररोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. भोसले नॉलेज सिटी येथे ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बीकेसीसह जिल्ह्यातील इतर शाळातील विद्यार्थ्यांसोबत ते थेट मराठीतून संवाद साधणार आहेत. तीन सत्रात ते सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी डॉ. माशेलकर यांच्यासोबत वैज्ञानिक हितगुज साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बीकेसीचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले यांनी केल आहे. 

वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत देशासाठी बहुमोल योगदान दिलं आहे. औद्योगिक, वैज्ञानिक, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात राष्ट्रासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिलं आहे. तब्बल ४९ विषयांत त्यांनी पीएचडी केली आहे. मुळ गोव्याचे असणारे डॉ. रघुनाथ माशेलकर हे येत्या २० डिसेंबरला सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटी येथे भेट देणार आहेत. सकाळी ९ वाजता त्यांच आगमन होणार असून बीकेसी हॉलमध्ये ते विद्यार्थी वर्गाशी संवाद साधणार आहेत. सुमारे एक हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. बीकेसीसह इतरही शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. यावेळी बीकेसीकडून त्यांचा सत्कार केला जाणार आहे.   

 डॉ. माशेलकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी पत्र लेखन व रील्स मेकिंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. यातील उत्कृष्ट पत्रांचा वाचन केलं जाणार आहे. १०.३० वा. जयू भाटकर प्रकट मुलाखतीतून आशावादी संवाद साधणार आहेत. दुपारी १. १५ नंतर विद्यार्थी वर्गासोबत वैज्ञानिक हितगुज ते साधणार आहेत. सायंकाळी 'हाय टी' या कार्यक्रमातून जिल्ह्यातील महनीय व्यक्ती, पत्रकार, शिक्षक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी उपस्थित राहून डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशी हितगुज साधाव असं आवाहन भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी केल आहे. याप्रसंगी डॉ. रमण बाणे, डॉ. विजय जगताप, नितीन सांडये आदी उपस्थित होते.