वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मालवणी खज्याचे व्यापारी बाबा नळेकर यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: May 07, 2023 21:03 PM
views 276  views

वेंगुर्ला:

तालुक्यातील वजराट- देवसुवाडी येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवणी खाज्याचे व्यापारी बाबुराव रामचंद्र नळेकर उर्फ बाबा नळेकर (६६) यांचे रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २मुलगे, २मुली,  नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्गातील मालवणी खाजेवाले म्हणून ते प्रसिद्ध होते. 

   तसेच बाबा नळेकर हे वजराट गावचे समाजसेवी व्यक्तिमत्त्व होते. तसेच त्यांनी वजराट ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी  संचालक म्हणून काम पाहिले होते. गोरगरिबांना अर्थीक तसेच जमेल त्या पद्धतीने  मदत करण्यात ते अग्रेसर होते. यावेळी वजराट गावातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपल्याची प्रतिक्रिया एम के गावडे यांनी व्यक्त केली आहे. बाबा नळेकर यांचे १२ दिवसांचे कार्य हे गुरुवारी ११ मे रोजी करण्यात येणार आहे.