
दोडामार्ग : आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, फाले कुटुंबाला न्याय मिळाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत आज मणेरी ग्रामस्थ व धनगर समाजाने दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले. मणेरी येथील मयत उमेश फाले याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या आणि फाले कुटुंबाला न्याय द्या तसेच राजकीय दबावा खाली तपास करून नको, धनगरसमाजाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण धनगर समाजाला घेऊन रस्त्यावर उतरू असे निवेदन देण्यात आलंय.
मणेरी येथील उमेश फाले याला दोन वर्षांपूर्वी उसप येथील तिघांनी खून केला होता. दोन वर्षानी पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. उसप येथील 3 आरोपींना ताब्यात घेतले. खुनाची सखोल चौकशी करून उमेश मृतदेह किंवा त्याचे अवशेष आमच्या हातात द्या आम्हाला त्याच्यावर अंत्यविधी करायची आहे. व उमेशच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा द्या व आम्हाला न्याय द्या.असे फाले कुटुंब व धनगर समाजाने पोलिसांना निवेदन दिल. यावेळी दोडामार्ग धनगर समाज व एकनाथ नाडकर्णी, भगवान गवस आदी धनगर समाजाचे लोक उपस्थित होते.
आज तुम्ही पोलीस ठाण्याला घोषणाबाजी करत आलात हे पूर्णपणे चुकीच आहे. 2 वर्षा पूर्वीचा खून आणि त्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. 100 % नाही तर एक लाख टक्के न्याय मिळवून देणार हा माझा शब्द आहे. आणि यात कोणी राजकीय पोळी भाजण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर यातून दुर रहावे, असं आवाहन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिल.