रोणापाल देवी माऊलीचा जत्रोत्सव सोमवारी

Edited by:
Published on: December 23, 2023 15:37 PM
views 69  views

सावंतवाडी : रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २५ डिसेंबरला  साजरा होत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे - फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मध्यरात्री आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.