निगुडेच्या ग्रामदैवताचा जत्रोत्सव बुधवारी

Edited by: भगवन शेलटे
Published on: December 23, 2023 15:34 PM
views 116  views

सावंतवाडी : निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २७ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर  देवीला भरजरी वस्त्र व  आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.यानिमित्त रात्री आजगावकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच निगुडे ग्रामस्थांनी केले आहे