
सावंतवाडी : आंबोली घाटात आढळलेल्या "त्या" अज्ञात तरुणाची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही. ठिकठिकाणी बेपत्ता झालेल्या तरूणांच्या मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलिसांची पथके "त्या" ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
आंबोली घाटात अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. संबंधित तरुणाचा घातपात झाला की, त्याने आत्महत्या केली याबाबत अध्यक्ष प्रश्नचिन्ह आहे. त्यानुसार तो तरुण नेमका कुठचा याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहे. गोव्यातील एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती पाठवण्यात आली. परंतु, त्यांनी अद्यापर्यंत संपर्क केलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे तर अन्य ठिकाणी बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात सावंतवाडी पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत पुढील तपास करताना अडचणी येणार आहेत. असे श्री. अधिकारी म्हणाले.