
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू करण्यात आलाय. ‘न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे निर्माण होणाऱ्या संधी व आव्हाने’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य प्रा. गजानन भोसले, संयोजक प्रा. दीपक पाटील व समन्वयक प्रा. प्रसाद सावंत उपस्थित होते. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली’ यांनी हा प्रशिक्षण वर्ग पुरस्कृत केला असून यामध्ये विविध तंत्रनिकेतन संस्थांचे १०० पेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले होते. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.