
सावंतवाडी : महाराष्ट्र कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी.टी.पी. या अभ्यासक्रमांमध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. डॅझल रॉजी फर्नाडिस (८८.२५%) जिल्ह्यात पहिला, कु. विक्रांत भालचंद्र धुपकर (८३.५०%) दुसरा, कु. रश्मी गोंविद सातार्डेकर (८२.७५%) तिसरी आली.
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. प्रतिक भिवा सावंत (८७.५०%) जिल्हयात पहिला, कु.वासुदेव गुरूनाथ परब (८२.५०%) दुसरा, तर कु. सिमरन सिराज सय्यद (८२.२५%) तिसरी आली.सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. मयुर संतोष सावंत (८६.००%) जिल्हयात पहिला, कु. जयराम ज्ञानदेव गोडकर (८४.२५%) जिल्हयात दुसरा, तर कु नम्रता मनोहर राऊळ (८४.२५%) जिल्हयात दुसरी व कु प्रकाश रामचंद्र चव्हाण जिल्हयात तिसरा या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उतीर्ण झाले. आदित्य नाईक, कृष्णाजी देसाई, विनायक मांजरेकर, जुनेद शेख, फेमिना डांटस, उझ्मा सय्यद,अनमोल गावडे, कानु बरागडे, दत्तराम जाधव, ऋषिकेश बरागडे, रुथ डिसोजा, स्नेहा सावंत,अनिकेत सावंत, भक्ती गवस, नितीन शिरोडकर, रोहित नाईक, ऋषिकेश टोपले, सेजल जोशी,वैष्णवी सावंत, पेरी अल्मेडा, संचित नाईक, मयुरेश गवंडे, प्रियांका राऊळ, सत्यम राऊळ, अनिषा परब, साक्षी मुळीक, सेजल गावडे, सयानी धुरी, मंदाकिनी जाधव, रिया पार्सेकर, श्वेता तुळसकर संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सरिता गवंडे यांनी मार्गदर्शन केले. आयटी, डीटीपी, व टॅली या अभ्यासक्रमांसाठी नवीन बॅचेससाठी प्रवेश सुरू असून प्रवेशासाठी संस्थेच्या वसंत प्लाझा, गांधी चौक, दुसरा मजला सावंतवाडी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.