
सावंतवाडी : राजकीय पदाधिकारी, प्रतिथयश नागरिकांची फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांच्या नावानं फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे तसेच फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रतिष्ठीतांच्या नावाचा गैरवापर हॅकर्सकडून केला जात आहे. याच पैशांची मागणी करण्यासह अश्विल फोटो, व्हिडिओ या अकांटवरून शेअर केले जात आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांच संबंधित प्रतिष्ठीत नागरिकांनी लक्ष वेधलं आहे.
तसेच सिंधुदुर्ग सायबर क्राईम विभागानं यात तातडीनं लक्ष घालत संबंधितांचा शोध लावावा व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पैशाची मागणी करणे, लुट करणे, अश्लील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणे असे प्रकार हॅकर्सकडून घडत असतात. राजकीय पुढारी, प्रतिष्ठीत नागरीक आता त्यांच्या रडावर आहेत. त्यामुळे संबंधित हॅकर्सच्या मुसक्या आवळण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे.