
कुडाळ : कुडाळ तालुक्यात शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही, शिक्षण मंत्री हाय हाय, मिंंदे सरकारचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणा देत कुडाळ पंचायत समिती समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले. १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही या पाश्वभुमिवर कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ पंचायत समिती समोर पालकांना सोबत घेऊन लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
येत्या काळात लवकरात शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न झाल्यास ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,जानवी सावंत,उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, संतोष शिरसाट,अतुल बंगे,नगरसेविका श्रुती वर्दम,श्रेया गवंडे,सई काळप ,जयभारत पालव,बबन बोभाटे,बाळा मृणाल परब, कोरगावकर, दीपक आंगणे, मिलिंद नाईक, महेश जामदार,स्नेहा दळवी, मुकुंद सरनोबत,वैशाली पावसकर पूनम पवार, लीलाधर अणावकर,आदी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.