
सावंतवाडी : क्रेडाई महाराष्ट्रच्यावतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘कृतज्ञता सप्ताहा’च्या निमित्ताने क्रेडाई सावंतवाडी तर्फे नॅब आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने पंचमी हाईट्स येथे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कामगार लोकांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली. तसेच काही कामगारांना चष्म्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. महिला कामगारांसाठी स्वतःची स्वच्छता आणि मुलांची देखभाल या संदर्भात क्रेडाई वुमन विंग तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगारांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.
यावेळी क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई, सचिव दादा खोर्जुवेकर, खजिनदार यशवंत नाईक, सदस्य प्रवीण परब, सतीश बागवे, उदय नाईक, लक्ष्मीकांत पांचाळ, क्रेडाई वुमन्स विंगच्या अध्यक्षा वैदेही देसाई, अमित खोर्जुवेकर, श्रुती कल्याणकर, युथ विंगच्या सदस्या कल्याणकर तसेच नॅबच्या डॉ.उत्कर्षा धोंडे आणि उपजिल्हा रुग्णालय तर्फे डॉ.अटक आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नॅब सावंतवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि पंचमी हाईट्सचे मालक श्री व सौ.खोर्जुवेकर यांचे मोलाचे सहकार्य क्रेडाई सावंतवाडी यांना मिळाले.