
सावंतवाडी : शहरातील गाडगेबाबा मंडईतीच्या नुतनीकरणासाठी येथील व्यापाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतराबाबत प्रशासनान सुचना दिली होती. आज व्यापारी वर्गानं माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली होती. अनंत चतुर्थीपर्यंत मंडईच्या ठिकाणी बाजारास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संजू परब यांनी भेट घेत लक्ष वेधलं. यानंतर नारायण राणे यांनी मुख्याधिकारी यांना गणेशोत्सवा पर्यंत व्यापारी वर्गाला मुदतवाढ देण्याची सुचना मुख्याधिकारी यांना केली आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंडईतील व्यापारी वर्गाला गणेशोत्सव पर्यंत मुदतवाढ देण्याची सुचना मुख्याधिकारी यांना केली आहे. अनंत चतुर्थीपर्यंत ही मुदतवाढ देण्यास त्यांना सांगितले आहे. तर याठिकाणचा न.प. प्रशासनानं बंद केलेला वीज पुरवठा देखील सुरु करण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली आहे.