हकालपट्टीची कारवाई हास्यास्पद : काका कुडाळकर

Edited by: भरत केसरकर
Published on: July 07, 2023 17:47 PM
views 205  views

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काका कुडाळकर यांनी पत्रकार परीषद घेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि आम्ही पक्ष सोडला नाही, पक्षातच राहणार आहोत.मात्र आपल्यावर केलेली हकालपट्टीची कारवाई हास्यास्पद आहे, अशी टीकेची झोड काका कुडाळकर यांनी उडवली आहे.

     ज्या अमित सामंतानी हकालपट्टी केली ते नेहमी सांगत होते की वरीष्ठ लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्ष लक्ष देत नाहीत असा त्यांचाच नेहमी आरोप असायचा.ह्या सगळ्या गोष्टींमुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली, त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कार्यपध्दती जबाबदार आहे.असा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे.आता  तुमच्याकडे कीती लोक होते हे तरी सांगा. जिल्हा कार्यकारणीची बैठकच कधी लावली नाही. संघटना वाढीचा वेग याना समजला नाही.अजितदादाच्या कार्यपध्दतीमुळेच आम्ही त्यांच्या सोबत गेलोत.हकालपट्टीच्या समाधानात त्यानी आनंदी रहाव.आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे काका कुडाळकर म्हणाले.

   आमचे प्रदेक्षाध्यक्ष सुनिल तटकरे हे आहेत.त्यांची 99टक्के संघटना आहे. ती त्याना लखभाल होवो. याना कधीच राष्ट्रवादीची मंडळीच कळली नाही. हे कार्यकर्त्याचे दुख आहे. कुडाळ तालुक्याला तालुकाध्यक्ष मिळाला नाही हे दुर्दैव आहे.आतापर्यंत जिल्ह्यातून एककलमी कार्यक्रम राबवला गेला. गटातटाचे राजकारण चाललय. हकालपट्टी चुकीची आहे. राज्याच्या घडामोडीत जिल्हाची घडी कशी बसवता येईल, हे बघण्यापेक्षा गटातटाचे राजकारण चालविले जाते.पक्ष संघटनेवर अवलंबुन असतो.फोटो सेशनवर नाही असत नाही.पक्ष जिल्ह्यात रसातळाला अशी टीका कुडाळकर यांनी केली. यावेळी काका कुडाळकर,प्रफुल्ल सुद्रिक,सरफराज नाईक,डाँ.अभिनंदन मालंडकर आदी उपस्थित होते.