सुट्टीच्या दिवशी कार्यकारी अभियंता मैदानात !

दर्जेदार कामासाठी ठेकेदाराला सूचना
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 23, 2023 12:33 PM
views 589  views

कणकवली : कणकवली आणि ओरोस रेल्वे स्थानक परिसरातच्या सुशोभीकरणाच्या कामाला काही महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती. त्यानंतर आता हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज प्रत्यक्षात सुट्टी असताना देखील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्याचे होत असलेले काँक्रिटीकरण दर्जेदार व्हावे यासाठी ठेकेदाराला व्यवस्थित काम करून घ्या व त्यावर पाणी देखील मारा अशा सूचना केल्या. सर्व गोड यांनी सांगितले की, 31 जानेवारीच्या आत हे काम आपण पूर्ण करणार असून हे काम दर्जेदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही प्रवाशांना ये-जा  करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या सुशोभीकरण कामाला स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केल्यामुळे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.