
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड, व भडगाव येथील पिठ ढवळ नदीवरील पूल माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर विक्रमी वेळात पूर्ण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बऱ्याच कालावधीपासून अणाव घाटचे पेड, व भडगाव येथील उंच पुलाचे काम प्रलंबित होते. या कामाबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या कामांना वेग आला. व ही दोन्ही विक्रमी वेळात ही कामे पूर्ण करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा अधीक्षक अभियंता छाया नाईक, उपअभियंता विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता सुरजगिरी, व ठेकेदार दीपक दळवी यांचा सत्कार करण्यात आला.