कसालातील श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह...!

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 08, 2024 05:57 AM
views 238  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल येथे श्री लिंगेश्वर मंदिरात आज पहाटे सहा वाजल्यापासून भक्तीमय वातावरणात श्री लिंगेश्वर मंदिरात भाविकांनी शिव पिंडीवर दुधाचे अभिषेक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज महाशिवरात्री उत्सवानिमित्त सर्वच तीर्थक्षेत्रांमध्ये सकाळपासूनच महादेवाच्या पिंडीवर दूध बेल,फुले वाहून अभिषेक करण्यात आले. ग्रामीण भागातील देवळांमध्ये सुद्धा ही पुजा आर्चा करण्याची परंपरा अजूनही सुरूच आहेत.

कसाल श्री लिंगेश्वर  या मंदिरात पहाटे सहा वाजल्यापासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिव पिंडीवर अभिषेक- दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.यावेळी तीर्थप्रसाद देण्यात आला . तर मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी कसाल गावचे मानकरी, पुरोहित,गुरव, गावकर मंडळी, ग्रामस्थ, भाविक, उपस्थित होते. तर मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.