
आंबोली : दरीत कोसळलेला युवकाच्या घटनेमागील एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. एखाद्या सिनेमातील सीन सारखी घटना समोर आली आहे. कराड येथील विट व्यावसायिकांमधल्या वादाची पार्श्वभूमी या घटनेला असून या वादातून दोन जीव गेल्याचा हा प्रकार आंबोलीत घडला आहे.
कराड येथील विट व्यावसायिकान एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला गाडीत घालून संबंधितांनी मारहाण केली. यावेळी त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन त्याचा मुर्त्यू झाल्याच मारणाऱ्या व्यक्ती पैकी एकाच म्हणन आहे. दरम्यान, देणेकरी मेल्यानं घाबरून आम्ही आंबोली गाठली. यावेळी घाटात त्या देणेकरी व्यक्तीचा मृतदेह टाकत असताना तो व्यक्ती ज्याचे पैसे देण लागत होत त्या व्यक्तीचा देखील पाय सटकून दोघे दरीत कोसळले. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या व्यक्तींन ही माहिती पोलीसांना दिली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ह्या घटनेमागच नेमक सत्य शोधून काढण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे.