
कणकवली : आपल्या बहिणीच्या गावी करूळ येथे गेलेल्या मंदाकिनी भिकाजी राणे (वय 88, रा.माईण - घाडीवाडी) या वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी ११.३० वाजता करूळ - फोफेवाडी येथील एका विहिरीच्या बाजूला सापडून आला. याबाबत मयत मंदाकिनी हिचा पुतण्या मिलिंद कांशीराम राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मंदाकिनी ही ९ फेब्रुवारी रोजी माईण गावातून आपल्या बहिणिकडे कणकवली तालुक्यातील करूळ गावात गेली होती. करूळमधून २३ फेब्रुवारी रोजी मंदाकिनी ही माईण येथे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती माईणमधील घरी न
पोचल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी हिचा मृतदेह सापडून आला. मिलिंद राणे यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











