
वेंगुर्ले : वेंगुर्ला पंचायत समितीच्या वतीने "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता" कार्यक्रम अंतर्गत मातोंड बांबर शाळा क्र. ५ येथे सार्वजनिक शौचालय चे उदघाटन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मातोंड बांबर क्रमांक ५ केंद्रशाळेत शासनाच्या संपूर्ण स्वछता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व मातोंड ग्रामपंचायत यांच्या निधीतून हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी कृषि अधिकारी प्रशांत चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत गुरुनाथ धुरी, कनिष्ठ अभियंता अनुप वळवी, गट समन्वयक द्रौपदी नाईक, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, उपसरपंच आनंद परब,ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, सुजाता सावंत, राहुल प्रभु, शिक्षक पालक संघ अध्यक्ष रवी सावंत, सदस्य शिवराम सावंत, स्वस्ति परब,मुख्याध्यापक सरमळकर, शिक्षिका जाधव व कोरगावकर अंगणवाडी सेविका हरमलकर, ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर परब, जयवंत परब, ठेलेदार संजीव परब आदी उपस्थित होते.