मनाने कधीच थकता कामा नये : रमेश पवार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 03, 2023 13:21 PM
views 77  views

देवगड : शरीर थकले तरी मन थकता कामा नये असे प्रतिपादन तहसीलदार रमेश पवार यांनी जेष्ठ नागरिकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले . प्रत्येक मनुष्य वयाने वृद्ध होत असतो अशावेळी मनाने थकून न जाता आयुष्य जगावे असा सल्ला उपस्थित जेष्ठ नागरिकांना तहसीलदार रमेश पवार यांनी दिला. जेष्ठ नागरिकांना उतार वयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते याची अधिकारी म्हणून जाणीव आहे तरी आपल्या कारकिर्दीत अशा कोणाच्याही समस्या असल्या त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आणि शासन स्तरावरील योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासितही त्यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना केले.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने एक ऑक्टोबर दिवशी जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. या दिनाच्या औचित्य साधून तहसीलदार रमेश पवार यांनी देवगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तहसील नागरिकांचा तहसीलदार दालनात गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी देवगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक निशिकांत साटम, प्राध्या. सुरेश सोनटक्के, रमाकांत जगताप ,शेखर इचलकरंजीकर, मीनाक्षी इचलकरंजी, अनिल साटम, यशवंत गद्रे, सुरेश पेठे ,जनार्दन परब, रघुनाथ परब ,जगन्नाथ परब ,महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्या सुरेश सोनटक्के निशिकांत साटम,शेखर इचलकरंजीकर,रमाकांत जगताप, विलास रुमडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदीप कदम यांनी मानले.