इथे मोदी उभे राहिले तरी विनायक राऊत निवडून येतील !

अमित सामंतांना ठाम विश्वास !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 22, 2024 09:18 AM
views 214  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, आम्हाला बदला घ्यायचा आहे. आम्ही मतदानाची वाट पाहात आहोत. २०१४ पासून आम्ही तुमच्या सोबत आहोत. सावंतवाडीत झब्यातून प्रसाद देणारे तुमच्याबद्दल तीन- तीन तास बोलत होते‌. आज तेच तुमच्या विरोधात बोलत आहेत‌. या मतदारसंघात नरेंद्र मोदी जरी उभे राहीले तरी विनायक राऊत निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सत्ताधारी भाजपला या लोकसभा मतदारसंघात उमेदवार सापडत नाही हाच इंडिया आघाडीचा विजय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्मासोबत राहील. निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षे ही आघाडी एकत्रित लढ्यासाठी अशीच मजबूत ठेवा असं मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले.


 याप्रसंगी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा गावडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, रूची राऊत, सावली पाटकर, बाळ कणयाळकर, हिदायतुल्ला खान, विशाल जाधव आदी उपस्थित होते.