दिवाळीपूर्वीच कुडाळात राजकीय 'धूमधडाका' | शहाजी बापूंची 'टोलेबाजी' आणणार रंगत

दिग्गज एकाच व्यासपीठावर | आगामी रणनीतीचे मिळणार संकेत ! कोकणसाद LIVE वर थेट प्रक्षेपण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 15, 2022 18:48 PM
views 286  views

कुडाळ : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येणार आहेत. काही क्षणातच राणे पिता - पुत्र आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उदय सामंत शिवसेनेत असताना राणे आणि  सामंत यांच्यात आरोप  प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आता राज्यातील समीकरणे बदलल्यानंतर राणे आणि सामंत हे एकत्र आले आहेत. आज कुडाळ येथे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या स्थानिक राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणाचा आखाडाही रंगणार आहे, कारण काय झाडी, काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE वर पाहता येणार आहे. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह पुढे होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही  भाजपाची ताकद वाढणार आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे यांनी निवडणुकीला उभं राहावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुका सर्वच निवडणुकांबाबत हे दोन्ही नेते काय भाष्य करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.