सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची स्थापना..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 30, 2023 12:08 PM
views 167  views

सावंतवाडी : कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना अनेक अडचणी येतात. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे लक्ष वेधण्यासाठी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची रविवारी स्थापना करण्यात आली. सावंतवाडी राजवाडा येथे संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तालुक्यातील देवस्थान उपसमितीचे पदाधिकारी व देवस्थान मानकरी यांच्या उपस्थितीत एकमताने या समितीची निवड करण्यात आली.

यात अध्यक्ष एल एम सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सहसचिव वसंत धुरी (सातोसे), सदस्य लक्ष्मण परब (चराठा), शिवराम सावंत, (तांबोळी), आनंद परब (मडूरे), पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली), यशवंत सावंत (डिंगणे), सुभाष गावडे (चौकुळ), चंदन धुरी (कोलगाव), जीजी राऊळ (माडखोल), मधुकर देसाई (डेगवे), रघुनाथ नाईक (आरोंदा), नारायण राऊळ (शिरशिंगे), बाबुराव दळवी (विलवडे), मधुकर गावडे (कुंभवडे), कायदेविषयक सल्लागार श्रीमंत युवराज लखमराजे भोसले, सल्लागार विलास सावंत (डिंगणे) यांची निवड करण्यात आली.

 यावेळी देवस्थानच्या उप समित्यांच्या प्रतिनिधींनी तसेच देवस्थान मानकरी यांनी नवीन उपसमिती स्थापन करताना येणाऱ्या अडचणी तसेच समितीचा कारभार पाहताना निर्माण होणाऱ्या समस्या समस्या मांडल्या. त्यानंतर याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते घेण्यात आलेला सर्वानुमते निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कळविण्याचे ठरविण्यात आले. यासाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला भेटण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. युवराज लखम सावंत भोसले यांनी सर्व देवस्थान उपसमित्यांचे पदाधिकारी व देवस्थान मानकरी यांच्या आपण सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली.