मिलाग्रिस प्रशालेमध्ये हरित मंचाची स्थापना

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 19:04 PM
views 92  views

सावंतवाडी : शहरातील मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेत शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांच्या संकल्पनेतून हरीत मंचाची स्थापना झाली . सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे वनपाल महादेव नाईक उपस्थित होते. सोबत सहाय्यक वनरक्षक योगेश सातपुते व  चंद्रहास जगदाळे हे सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांचे स्वागत अनिता गावडे यांनी  केले.

प्रास्ताविक विवेकानंद जोशी यांनी केले. त्यामध्ये जागतिक पर्यावरण दिन व हरित सेना याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिलाग्रिस हरित मंच याचे फित कापून उद्‌घाटन करण्यात आले. या शालेय वर्षासाठी "Go Green"ही  Theme निवडण्यात आली.  इयत्ता 10वी(अ)मधील विद्यार्थ्यांनी कु. कोमल डांगी हिने राष्ट्रीय हरित सेना या उपक्रमाचे स्वरूप व महत्व पटवून दिले. हरित मंचा विषयी असलेली प्रतिज्ञा सर्व विद्यार्थि व उपस्थितांनी घेतली . 

सामाजिक वनीकरण विभागाने या कार्यक्रमासाठी प्रशालेला ५० रोपे प्रदान केली.प्रमुख पाहुण्यानी विदयार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले व मिलाग्रिस हरित मंचाला शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी मुलाना अध्यक्षीय भाषणातून इको क्लब विषयी सांगुन प्रत्येकाने एक तरी झाड लावून व वाढवून आपले कर्तव्य कसे पार पाडावे व कृतज्ञ रहावे हे प्रतिपादन केले. वृक्ष आपले सखे सोयरे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी हिरवे पोशाख परिधान केल्याने कार्यक्रमाला विशेष शोभा आली. 

पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार सौ गावडे टिचर यांनी मानले. त्यानंतर प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.