कोकणसाद LIVE च्या निबंध स्पर्धेची अंतिम तारीख वाढविली !

कशी असेल स्पर्धा ?
Edited by: जुईली पांगम
Published on: February 20, 2024 11:10 AM
views 408  views

सिंधुदुर्ग : कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE घेऊन आलंय तुमच्यासाठी खास निबंध स्पर्धा. कोकणसाद LIVE दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त हटके उपक्रम राबवत असतं. याहीवर्षी ही परंपरा कायम राखत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यंदाच्या 10 व्या वर्धापन दिनाची 'बदलतं कोकण' थीम असणार आहे. याच अंतर्गत 'बदलतं कोकण' या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसंही मिळणार आहेत. वाढत्या प्रतिसादामुळे नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आलीय.

कशी असेल स्पर्धा ?

  • 'बदलतं कोकण' या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. 
  • 500 शब्दांची मर्यादा असेल.
  • दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. 
  • पहिला गट : 8 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 
  • दुसरा गट : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 
  • हे निबंध 7720096037 या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवायचे आहेत.
  • निबंध पाठवताना पूर्ण नाव, पत्ता, इयत्ता, वय, मोबाईल नंबर याचा उल्लेख असावा. 
  • निबंध पाठवण्याची 25 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. 


आकर्षक बक्षीस !

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसंही मिळणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्यास 2000 रु. आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्यास 1500 रु. आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्यास 1000 रु. आणि सन्मानचिन्ह अशी बक्षीस असणार आहेत. 

विजेत्यांना सावंतवाडी भोसले नॉलेज सिटी इथं होणाऱ्या आमच्या वर्धापन दिन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता आमच्या निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन टीम कोकणसाद LIVE च्यावतीने करण्यात आलंय. चला पेन उचला...लिहिते बना...


टीप : सर्व अधिकार आणि अंतिम निर्णय कोकणसाद LIVE कडे राहील