
देवगड : देवगड तालुक्यातील ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आधारस्तंभ असलेल्या ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या चळवळीचा सुकाणू आपल्या खांद्यावर घेणारे जबाबदार कार्यकर्त्यांचा सहविचार मेळावा ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांचे समवेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास ओरसहून मिलिंद सावंत आले होते. गुरुनाथ लोम्बर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करून मेळाव्याच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले.
ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊतसाहेब यांचे सक्षम व कुशल नेतृत्वाखाली ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आज तागायत करीत असलेल्या आंदोलनाची व पुढील करावयाच्या संघर्षाची माहिती ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांनी सविस्तरपणे मांडली. समितीच्या उगमापासून समिती करीत असलेल्या संघर्षाच्या वाटचालीची यशोगाथा कथन करून संगठन बळकटीकरण, विस्तारीकरण व ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या जागृतीकरण करणेबाबतच्या मार्गाचे सविस्तर स्पष्टीकरण अजितकुमार घाडगेंनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे समर्पक शब्दात आंदोलनाचे वर्णन करून समाधानकारक विश्लेषण करुन आंदोलनात सक्रिय सहभागी होणेस आवाहन केले. त्यास उपस्थितांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देवून पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभागी होणेचे आश्वासित केले.
मेळाव्याला गुरुनाथ लोम्बर, चंद्रहास मर्गज, दत्तात्रय आरेकर, विनायक महाडिक आणि ओरोसहून खास मेळाव्यासाठी उपस्थित झालेले मिलिंद श्रीधर सावंत आदी मान्यवरांनी वैचारिक मार्गदर्शन केले.विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागातून आपले योगदान देवून मोलाचे सहकार्य केले.