उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 29, 2024 07:35 AM
views 307  views

 सिंधुदुर्ग :  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे साठी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत असतानाच आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उबाठा सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. वैभववाडीतील या पक्षप्रवेशामुळे उबाठा सेनेला फार मोठा धक्का मानला जात आहे.

वैभववाडी तालुक्यातील युवासेना उप जिल्हा प्रमुख अतुल सरवटे, माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव, गटप्रमुख राहुल घाडी यांच्या सह वेंगसर गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रसाद गुरव, प्रशात घाडी, सिध्देश घाडी, शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे, रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांचा समावेश आहे.  आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी आमदार नितेश राणे, शक्ती प्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे,भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वैभववाडी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.