ओवळीये सरपंचांचा सेनेत प्रवेश

Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 14:38 PM
views 1077  views

सावंतवाडी : ओवळीये ग्रामपंचायत सरपंच तारामती नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ग्रामविकास आघाडीतून त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्यासमवेत या ग्रामपंचायतीचे सदस्य ही शिवसेनेमध्ये दाखल झाले.

यावेळी सदस्य उमेश नाईक अनिल सावंत चंद्रकांत सावंत बाबुराव सावंत उत्कर्ष नाईक योगेश धुरी यांनी प्रवेश केला. यामध्ये मोलाचा वाटा विनायक उर्फ अब्ज सावंत यांचा असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. यावेळी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मंत्री केसरकर यांनी आश्वासन दिले.